‘निर्लज्जम सदा सुखी’ कादंबरीचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:28+5:302021-03-23T04:11:28+5:30

पुणे : “भ्रष्टाचार, बेदरकारी, थापेबाजी, बेमुवर्तखोरी, अरेरावी असे शब्द उफाळून वर यायला लागले की आपसूक सडक्या सिस्टीमची आठवण या ...

Publication of the novel 'Nirlajjam Sada Sukhi' | ‘निर्लज्जम सदा सुखी’ कादंबरीचे प्रकाशन

‘निर्लज्जम सदा सुखी’ कादंबरीचे प्रकाशन

googlenewsNext

पुणे : “भ्रष्टाचार, बेदरकारी, थापेबाजी, बेमुवर्तखोरी, अरेरावी असे शब्द उफाळून वर यायला लागले की आपसूक सडक्या सिस्टीमची आठवण या शब्दांबरोबर जोडून येते. समाजात निर्लज्ज, बेशरम मंडळी खूप प्रमाणात शिल्लक असल्याचे दिसून येते. लेखक अमोल करंबे लिखित आणि लिजेंडरी बुक्स प्रकाशित ‘निर्लज्जम सदा सुखी’ या कादंबरीत असे अनेक किस्से आहेत.

कादंबरीचे प्रकाशन नुकतेच चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. या वेळी लिजेंडरी प्रकाशनाचे सीईओ कुणाल मराठे उपस्थित होते.

दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले की, प्रवास, भटकंती आणि फिल्म हे माझे आवडते विषय. त्यातच ही कादंबरी संपूर्ण माझ्या आवडत्या विषयावर लिहिली गेली आहे. त्यात डॉक्युमेंटरीमध्ये असणारे कॉलेजच्या आठवणी खूप जवळच्या वाटतात. आणि अर्थातच, कादंबरीचं नाव आणि अमोलने सांगितलेले निर्लज्जांचे दोन प्रकार, त्याचे समाजातील निरीक्षण आणि लेखनातील उत्कृष्टपणा सांगून जातात.

“निर्लज्जम सदा सुखी कादंबरीचा ड्राफ्ट आमच्याकडे आला तेव्हा डॉक्युमेंटरी, विदर्भाच्या कुशीतील ठिकाणांचा उल्लेख वाचला आणि ही कादंबरी नवीन विषय घेऊन आलीय हे कळताच ही प्रकाशनाचा बेत नक्की केला, असे लिजेंडरी प्रकाशनाचे सीईओ कुणाल मराठे म्हणाले. कादंबरीचे लेखक अमोल करंबे म्हणाले, “माझ्या मूळ गावावर माझा खूप जीव. विदर्भ परिसर तसा अजून इतर महाराष्ट्रात पूर्णपणे परिचित नाही. या कादंबरीच्या अनुषंगाने राज्यातील या भागाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावी अशी छुपी इच्छा तर होतीच, शिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समाजप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करुन द्यावी असेही वाटत होते.

Web Title: Publication of the novel 'Nirlajjam Sada Sukhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.