पीयूसीसाठी मोजले पावणेतीन कोटी, १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 05:19 AM2018-04-08T05:19:55+5:302018-04-08T05:19:55+5:30

पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

For PUC, 15 thousand drivers were to be dealt with | पीयूसीसाठी मोजले पावणेतीन कोटी, १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले

पीयूसीसाठी मोजले पावणेतीन कोटी, १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले

Next

पुणे : पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
शहरातील वाहनसंख्या ३६ लाख २७ हजार २८०वर पोहोचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे. वाहनसंख्येमुळे शहरातील वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचे प्रदूषण महामंडळाच्या पाहणीत दिसून आले आहे.
गेल्या ८ वर्षांत ३४ हजार २३३ वाहनांची तपासणी आरटीओने केली. त्यात १३ हजार ४१७ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नव्हते. त्यातील १ हजार ८३२ वाहनचालकांवर २०११ ते जानेवारी २०१८ या कालावधीत खटले दाखल करण्यात आले. याच कालावधीत ८ हजार ७६८ वाहनचालकांकडून २ कोटी ७१ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या ८ वर्षांत २०१३-१४ या वर्षी सर्वांत कमी १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड जमा झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. आरटीओकडे वायुप्रदूषण मोजण्यासाठी ३ ते ४ यंत्रे आहेत. मात्र, त्यांची हाताळणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे समजते.

गेल्या तीन वर्षांतील कारवाईचा तपशील

वर्ष तपासलेली पीयूसी नसलेली कोर्ट दंडात्मक एकूण दंड
वाहने वाहने केस कारवाई (लाखांत)
२०१५-१६ ६,६६२ १,८२७ ७२ १,१४२ ४०.७६
२०१६-१७ ५,२१२ १,४४३ ७८ ९,९६ ४९.३७
२०१७-जाने १८ ८,७६ ५,७२ ४२ ४,१० ३४.४४

Web Title: For PUC, 15 thousand drivers were to be dealt with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे