पुजा चव्हाण मजल्यावरुन पडली की कोणी ढकलले? ........ या आधीची हीच बातमी वाचून दिली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:22+5:302021-02-14T04:12:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विदर्भातील कँबिनेट मंत्र्यांचा संबंध जोडल्या गेलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने पत्र ...

Puja Chavan fell from the floor or someone pushed him? ........ I have read the same news before | पुजा चव्हाण मजल्यावरुन पडली की कोणी ढकलले? ........ या आधीची हीच बातमी वाचून दिली आहे

पुजा चव्हाण मजल्यावरुन पडली की कोणी ढकलले? ........ या आधीची हीच बातमी वाचून दिली आहे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विदर्भातील कँबिनेट मंत्र्यांचा संबंध जोडल्या गेलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने पत्र पाठवले आहे. या प्रकरणी तपासानंतर अहवाल पाठविणार असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७) घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यु झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये कँबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पुजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पुजाच्या मोबाईल आणि लँपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपाने व्यक्त केला आहे.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले, “राष्ट्रीय महिला आयोगाचे पत्र मिळाले असून पूजा मृत्यू प्रकरणाचा सर्व अंगाने तपास सुरु आहे. तिचे कुटुंबीय गावी असून आमच्याकडे त्यांच्यापैकी कोणाचीही तक्रार आलेली नाही. ही घटना घडली त्यावेळी उपस्थित असणारा तिचा चुलत भाऊ व मित्राचे तसेच या प्रकरणाशी संबधितांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.”

पूजा चव्हाण राहात होती. ते घर तिने भाड्याने घेतले होते. गेल्या ८ दिवसांपूर्वीच पूजा तेथे राहण्यासाठी आले होते. या घराची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा घरात मद्याच्या ४ बाटल्या सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरुन घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड म्हणाले, “पूजाचे पोस्ट मार्टम करण्यात आले आहे. तिच्या सोबत असलेल्या तिच्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यात गुन्हा नोंद करता येत नाही. मात्र या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत आम्ही तपास करणार आहोत.”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना शुक्रवारी रात्री मुंबईला तातडीने बोलावून घेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. “पूजा चव्हाण हिने भरपूर मद्य प्राशन केले होते. घटनेच्या वेळी पूजा गॅलरीच्या कठड्यावर बसलेली होती,” असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.

Web Title: Puja Chavan fell from the floor or someone pushed him? ........ I have read the same news before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.