ढेकळवाडी ते पताका ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:35+5:302021-02-14T04:11:35+5:30
काटेवाडी : ढेकळवाडी ते पताका ओढा, मारुती मंदिर या रस्त्याच्या कामाची सुरुवात भालेराव झारगड व नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते करण्यात ...
काटेवाडी : ढेकळवाडी ते पताका ओढा, मारुती मंदिर या रस्त्याच्या कामाची सुरुवात भालेराव झारगड व नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते करण्यात आली. ढेकळवाडी येथून भवानीनगरकडे जाणारा हा रस्ता पताका ओढा येथे बारामती-इंदापूर रस्त्याला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता सोयीचा ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक कोटीहून जास्त रकमेचा निधी रस्त्याच्या विकासकामासाठी मंजूर झाला आहे. या रस्त्यासह काटेवाडी रस्ता ते चोपडेवस्ती या रस्त्यासाठी वीस लाख रुपये, ३५ फाटा ते गोफणे वस्ती या रस्त्यासाठी वीस लाख रुपये. ढेकळवाडी ते पताकाचा ओढा रस्त्यासाठी वीस लाख रुपये, हालगीवस्ती रस्तासाठी १५ लाख रुपये.
खताळपट्टा येथील गोरवेवस्ती गटार योजना पंधरा लाख रुपये, तर ढेकळवाडी येथील करडे वस्ती रस्तासाठी पंधरा लाख रुपये असे एकूण एक कोटी पाच लाख रुपये विकासाकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे .
यावेळी अविनाश भिसे,बापुराव ठोंबरे, बापुराव सोलनकर, आबा टकले, अण्णासाहेब पिंगळे, सुभाष ठोंबरे, बाळासाहेब बोरकर, शिवाजी लकडे , शुभम ठोंबरे, राहुल कोळेकर, राहुल ठोंबरे,संजय टकले, हर्षद चोपडे, अमोल समीदर, दिलीप देवकाते,अजित घुले,दिलीप घुले,विनोद चोपडे, भिमराव घुले,विजय गोफणे,आप्पासो ठोंबरे, दतात्रय धायगुडे, नामदेव ठोंबरे, गिरीधर ठोंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.