पाचशे-हजारामुळे पुणेकर कुडकुडले
By admin | Published: November 11, 2016 01:53 AM2016-11-11T01:53:10+5:302016-11-11T01:53:10+5:30
थंडी सुरू झाली, की नागरिकांची पावले स्वेटर खरेदीकडे वळतात. विविध प्रकारचे रंगबेरंगी स्वेटर खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो.
पुणे : थंडी सुरू झाली, की नागरिकांची पावले स्वेटर खरेदीकडे वळतात. विविध प्रकारचे रंगबेरंगी स्वेटर खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो. यंदा मात्र ५०० व १०००च्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे सुट्या पैशांच्या टंचाईमुळे नागरिकांना कुडकुडतच थंडीचे स्वागत करावे लागत आहे.
स्वेटर विक्रते व नागरिकांना या निर्णयाचा फटका बसला आहे. सुटे पैसे नसल्याने नागरिकांना स्वेटर खरेदी करता येत नाही. तर, विक्रेत्यांना ग्राहकांकडे सुटे पैसे नसल्याने सोडून द्यावे लागत आहे. थंडीच्या सुरुवातीला लक्ष्मी रस्त्यावरील स्वेटरचे स्टॉल गर्दीने फुलून जातात; यंदा मात्र या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. अशीच परिस्थिती पुण्याच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. स्वेटरची किंमत साधारण ३०० ते २०००च्या दरम्यान असल्याने एखाद्याने ८००चा स्वेटर घेतला, तर विक्रे त्याला देण्यास लोकांकडे ५०० व १०००च्या नोटांऐवजी सुटे पैसे नाहीत, काही विक्रेते गुरुवारी ५०० व १०००च्या नोटा स्वीकारत होते; मात्र त्यांच्याकडीलही सुटे पैसे संपल्याने ग्राहकांना नाही म्हणावे लागत होते. त्यामुळे स्वेटर व्यावसायिकांच्या विक्रीला ऐन थंडीत फटका बसला आहे. सुटे पैसे नसल्याने या विक्रेत्यांना नुसते बसून राहावे लागत आहे.(प्रतिनिधी)