पुणोकरांना अनुभूती गुलाबी थंडीची.!
By admin | Published: November 2, 2014 12:06 AM2014-11-02T00:06:27+5:302014-11-02T00:06:27+5:30
गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची वाट पाहणा:या पुणोकरांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात घट होत आहेत.
Next
पुणो : गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची वाट पाहणा:या पुणोकरांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात घट होत असून, आज ते आणखी घसरून 14.3 अंशावर आले. यामुळे रात्री हवेतील गारवा वाढला असून, पुणोकरांना गुलाबी थंडीची अनुभूती येऊ लागली आहे. त्यामुळे पुणोकरांची पावले स्वेटर्स, जर्किन, कानटोप्या घेण्याकडे वळू लागली आहेत.
ऑक्टोबर हिटमुळे गेल्या महिन्यात पुण्याचे कमाल तापमान चांगलेच वाढले होते. यामुळे पुणोकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. गेल्या आठवडय़ात दोन दिवसांसाठी शहराच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली होती. यामुळे थंडीचे आगमन झाल्याचे जाणवत होते. मात्र पुन्हा अचानक तापमानात मोठी वाढ झाली. मात्र आता पुन्हा तापमान घटू लागले आहे. कमाल तापमान सरासरीच्या वर होते, ते 32.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा 2.1 अंश सेल्सिअसने घटले होते.
थंडी जाणवू लागल्यामुळे स्वेटर्स, जर्किन, कनाटोप्या घेण्यासाठी पुणोकरांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. सायंकाळनंतर स्वेटर्स घातलेले पुणोकर शहरात दिसू लागले आहेत, तर काही ठिकाणी शेकोटय़ाही पेटू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)