पंचनामे झाले; मात्र शासकीय मदत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:28+5:302021-09-27T04:11:28+5:30

नीरा नरसिंहपूर : नीरा नरसिंहपूर परिसरातील पिंपरी बुद्रुक, नरशिंंहपूर, गिरवी, टणू, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, लिंबुडी, सराटी, गणेशवाडी, ...

Punchnama was done; But government aid did not reach | पंचनामे झाले; मात्र शासकीय मदत पोहोचेना

पंचनामे झाले; मात्र शासकीय मदत पोहोचेना

Next

नीरा नरसिंहपूर : नीरा नरसिंहपूर परिसरातील पिंपरी बुद्रुक, नरशिंंहपूर, गिरवी, टणू, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, लिंबुडी, सराटी, गणेशवाडी, आडोबा वस्ती, शिंदे वस्ती, तालुका इंदापूर येथे ५ महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळीबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी व पंचनामे शासनातर्फे करण्यात आले होते. यामुळे आता लवकर मदत मिळेल या आशेत शेतरकी होते. मात्र, ५ महिने उलटूनही शासानची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसऱ्या बाजूने निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आवकाळी पावसाचे मोठे संकट निर्माण झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नीरा नरसिंहपूर परिसरातील ज्या त्या विभागाचे कृषी सहायक अधिकारी यांनी पडझड झालेल्या केळीचे केलेले पंचनामे पुढील मंजुरीसाठी शासन स्तरावर अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे पाठवले आहेत. या बाबत पाठपुरावा करून शेतकऱ्यांसाठी बँक खात्यामध्ये येणारी शासनाकडील मदत जमा करावी. या परिसरात अवकाळीचा फेरा सुरूच आहे. यामुळे

लवकरात लवकर मदत मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

# चौकट::-

पिंपरी बुद्रुक येथे जिल्हा बँकेच्या उद्घाटन वेळेस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे बाळासाहेब सुतार यांनी यासंदर्भात लेखी स्वरूपात पत्र देखील दिलेले आहे तरी अद्यापही पाठपुरावा झालेला नाही.

----------------------//

#चौकट::- इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी याकडे लक्ष देऊन कष्टकरी गरीब शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा ग्रामस्थांची मागणी.

------------------------------------------

फोटो :-ओळी- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पाच महिन्यांपूर्वी पडझड झालेली केळीची पाहणी करीत असताना ग्रामस्थ.

Web Title: Punchnama was done; But government aid did not reach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.