पंचनामे झाले... पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:29+5:302020-11-26T04:27:29+5:30

पुणे : शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आठ-बाय दहाच्या खोल्यांमध्ये फुललेला संसार अवघ्या काही क्षणात ...

Punchnama was done ... what next? | पंचनामे झाले... पुढे काय?

पंचनामे झाले... पुढे काय?

Next

पुणे : शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आठ-बाय दहाच्या खोल्यांमध्ये फुललेला संसार अवघ्या काही क्षणात नाहीसा झाला. दररोजच्या जगण्याचा संघर्ष मांडलेला असतानाच अचानक कोसळलेल्या या संकटातून मार्ग काढायचा कसा अशा विवंचनेत लोहियानगर येथील जळीतग्रस्त आहेत. जळालेल्या घरांचे पंचनामे झाले... आता पुढे काय? असा उद्विग्न सवालही त्यांनी यंत्रणेला केला आहे.

लोहियानगर वसाहतीमध्ये सोमवारी रात्री आग लागली. पुठ्ठ्यांपासून बॉक्स बनविण्याच्या घरगुती कारखान्याला लागलेली आग बघता बघता वाढली. आठ ते दहा घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्याने नागरिक आपल्या मुलांना, घरातील ज्येष्ठांना घेऊन बाहेर पळाले. नागरिकांनी जागरुकता दाखवित घरातील सिलेंडर बाहेर काढून ठेवले. अग्निशामक दलाचे मुख्य केंद्र अगदी जवळच असल्याने तेथूनच पाईप लावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या आगीमध्ये कोणाच्या घरातील मौल्यवान वस्तू जळून गेल्या. तर, कोणाच्या मुलांचे शैक्षणिक साहित्य जळून गेले. पै-पै जोडून जमा केलेले पैसे, कपडे, संसारोपयोगी वस्तू जळून गेल्या. ही आग धुमसत असताना एकही नगरसेवक किंवा अधिकारी फिरकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अधिकारी आणि नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी भेट दिली.

===

एरवी आगीच्या घटना घडल्यानंतर पालिका प्रशासन-नगरसेवकांकडून जवळच्या शाळांमध्ये जळीतग्रस्तांची व्यवस्था केली जाते. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली जाते. परंतू, अशी कोणतीही सोय करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Punchnama was done ... what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.