पुंदरच्या अंजिराचे होणार आता ब्रँडीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:18+5:302021-01-23T04:11:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गराडे : राज्यात व देशातही प्रसिध्द असलेल्या पुरंदरच्या अंजीराला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी मिळूनच ...

Punder's figs will now be branded | पुंदरच्या अंजिराचे होणार आता ब्रँडीग

पुंदरच्या अंजिराचे होणार आता ब्रँडीग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गराडे : राज्यात व देशातही प्रसिध्द असलेल्या पुरंदरच्या अंजीराला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी मिळूनच आपल्या कंपनीद्वारे विशिष्ट पारदर्शक पनेटमध्ये पॅकेजिंग करुन ‘सुपर फिग’ नावाचा अंजिराचा ब्रँड तयार केला आहे. ब्रँडींगसाठी राज्य अंजीर उत्पादक संघाच्या पुढाकाराने पुरंदर हायलँडस फार्मर्स ग्रुप कंपनी स्थापन करन्यात आली असून १७ जानेवारीपासून या ब्रँडिंगच्या पॅकेजिंगची विक्री पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सुरु झाली. एकुणच टोपली, पाटीत विक्रीला जाणारा अंजीर आता ‘पनेट’ मध्ये मुल्यवाढ घेण्याकडे पाऊल टाकत आहे.

देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांची नुकतीच गोविंदबागेत शेतकऱ्यांच्या पुरंदर हायलँडस फार्मर्स ग्रुप कंपनीचे अध्यक्ष रोहन सतिश उरसळर, अंजीरसंघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, गणेश जाधव, माऊली मेमाणे, ज्ञानेश्वर फडतरे , नितीन इंगळे, बापू शेलार, दिपक जगताप आदींनी एकत्रित भेट घेतली. तिथे अंजीर फळांनी ब्रँडिंगसह पॅकींग केलेली पनेट, ट्रेसह तयार बाॅक्सचे सादरीकरण केले. या बँडिंगचे लाॅचिंग करताना पवार यांनी विशिष्ट पनेटमधील पॅकेजिंग सुपर फिग` नावाने केल्या ब्रँडिंगचे कौतुक केले. तसेच पुरंदरमधील इतर फळे, भाज्यांमध्येही हा प्रयोग करा, असे सूचित केले. पवार यांच्याशी बोलताना रोहन उरसळ व रामचंद्र खेडेकर म्हणाले, स्ट्राॅबेरीचा खप व मुल्य केवळ पॅकींगमुळे वाढले. या पॅकींगमधून अंजीराचा टिकाऊपणा व मुल्यही वाढणार आहे. भविष्यात जीआयमुळे पुरंदर अंजिराला या नव्या ब्रँडिंग व पॅकेजिंगमधून १६० हून अधिक देशांची जागतिक बाजारपेठ अफाट वेगाने वाढणार आहे. रामचंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जाधव हे गुरोळी येथे तालुक्यातील अंजीर संकलन व पॅकिंगची जबाबदार पार पाडणार आहेत. पुढे अंजीर प्रक्रीयेत नितीन इंगळे व सहकारी जबाबदारी घेणार आहेत. याकामी कृषीच्या गुण नियंत्रणचे संचालक दिलीप झेंडे, मुख्य गुणवत्ता अधिकारी सुनिल बोरकर, पणनचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार हे उत्पादक संघाला बळ देत आहेत.

- चौकट

* पॅकिंग कसे आहे ?

- अंजिरात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, पोटॅशिएम,

काॅपर, विटॅमिन ए. के. हाय फाबरचे महान स्त्रोत असल्याचेही लक्षवेधी स्टिकर

- एका पारदर्शक पनेटमध्ये चार अंजीर, २०० ग्रॅम फळे

- पुठ्ठ्याच्या एक ट्रेमध्ये ८ पनेट

- आऊटर बाॅक्समध्ये ७ ट्रे

- एका आऊटर बाॅक्समध्ये ११.२ कि.ग्रॅ. अजीर जाणार

- प्रत्येक पनेट, ट्रे व बाॅक्सवर साईजनुसार स्टिकर्स

.. .. .. .. ..

* फायदे काय ?

- काढणी हातळणीत हँडग्लोजमुळे हाताला जखमा टळतील

- पनेटममुळे हात न लागता अंजीर सुरक्षित ग्राहकांपर्यंत पोचेल

- अंजीर फुटणे, मार लागून पाणी सुटण्याचे प्रकार बंद होतील

- काढणी पश्चात तंत्राने टिकाऊपणा दिड - दोन दिवसांनी वाढेल

- फळाचे बाजारमुल्य वाढून उत्पादकांचा फायदा

- अंजिराची साल पातळ असल्याने हाताळणीत होणारे मोठे नुकसान टळणार

- पुठ्ठा बाॅक्सशी संपर्क आल्याने फळाला होणारी बुरशी आता टळेल

---------------

- चौकट

जीआय लोगोकडे वाटचाल

पुरंदरच्या अंजीराला भौगोलिक निर्देशांक (जीआय) सन २०१६ मध्ये मिळाला. पुरंदरचे सुपूत्र डाॅ. विकास खैरे, संघाचे अध्यक्ष रविंद्र नवलाखा, सल्लागार गणेश हिंगमिरे यांनी ही कामगिरी बजावली. पुरंदर तालुक्यातील अंजिराला जागतिक बाजारपेठ मिळणे सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ग्रेडींग, पॅकींग व जीआय लोगो तयार करुन अंजिरास क्वालिटी टॅगमुळे ब्रँडचे संरक्षण करण्याच्या हालचाली असतानाच दिड वर्षांपूर्वी डाॅ. खैरेंचे निधन झाले, तर नवलाखा आजारी झाले. त्यामुळे संघामार्फतच पुढाकार घेत उत्पादक शेतकरी कंपनी स्थापून ग्रेडींग, पॅकींग, ब्रॅडिंगचे काम हाती घेतले. आज पुण्यात व उद्यापासून मुंबई (वाशी) मार्केटमध्ये हे नवे पॅकिंग ग्राहकांच्या पसंतीला उतरविले जात आहे. त्यातच पुण्यातील रिटेल मार्केटमधून व हैद्राबादच्या मार्केटमधून या पॅकिंगला मागणी आली आहे. पुढे जी.आय. मॅपिंग, नोंदणी व जीआय लोगोकडे वाटचाल असेल.

- रोहन उरसळ, अध्यक्ष, पुरंदर हायलँडस फार्मर्स ग्रुप कंपनी

----------------

बातमीसोबत फोटो पाठवित आहे.

-फोटोओळी

१) गोविंदबाग (ता. बारामती) येथे पुरंदरमधील शेतकरी कंपनीमार्फत पारदर्शक `पनेट` आणि ब्रँडिंगमध्ये अंजिराचे लाॅचिंग करताना शरद पवार व समवेत रोहन उरसळ,रामचंद्र खेडेकर, गणेश जाधव व कंपनीचे पदाधिकारी, शेतकरी.

२) पँकिंग केले अंजीर ३) अंजीराचे सुरु असलेले पँकिजिंग

Web Title: Punder's figs will now be branded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.