पुणे : ‘पद्मावत’विरोधासाठी तोडफोड, करणी सेनेच्या १५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:57 AM2018-01-25T05:57:48+5:302018-01-25T05:58:06+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. गुरुवारी (दि. २५) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत.

Pune: 15 people detained for Padmavat, and 15 of Karani Sena arrested | पुणे : ‘पद्मावत’विरोधासाठी तोडफोड, करणी सेनेच्या १५ जणांना अटक

पुणे : ‘पद्मावत’विरोधासाठी तोडफोड, करणी सेनेच्या १५ जणांना अटक

Next

पुणे : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. गुरुवारी (दि. २५) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत. सिनेमाला विरोध करण्यासाठी २० ते २५ जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणाºया सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान १० वाहनांचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी घटनास्थळावरून १५ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़
पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी यापूर्वी पुणे शहरात करणी सेनेने मोर्चा काढला होता. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. २५ जानेवारीला भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यापूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी महेश भापकर (वय ३०, रा़ गांधीनगर, डोंबिवली, जि़ ठाणे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते आपल्या चालकासह ट्रक घेऊन कुर्ला येथे जात होते. वडगाव पुलाजवळ ते आले असताना २० ते २५ जणांचा जमाव अचानक गाडीसमोर आला. त्यामुळे गाडी थांबविली असताना लोकांनी दगड मारून काचा फोडल्या व टायरमधील हवा सोडून दिली. तसेच त्यांच्याकडील ३ हजार ९०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले़
त्यांच्यामागोमाग येणाºया ८ ते १० वाहनांच्या काचा फोडून टायरमधील हवा सोडून दिली व पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली़ याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक घाडगे व तपास पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी आंदोलन करणाºयांना ताब्यात घेतले़ त्यांच्यावर अन्य कलमांसह दरोड्याचे कलमही लावण्यात आले़
अटक केलेल्या १५ जणांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले़ सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले, की हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे़ या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करायची आहे़
फिर्यादीकडून जबरदस्तीने काढून घेतलेले ३ हजार ९०० रुपये जप्त करायचे आहेत़ त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली़ न्यायालयाने ती मान्य करून १५ जणांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़
शहरात कडेकोट बंदोबस्त
पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील ३६ चित्रपटगृहांमधील ८० स्क्रिन्सवर पद्मावत हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत असून त्याला होणारा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे़ याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर यांनी सांगितले, की चित्रपटगृहचालकांना अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यास सांगितले आहे़
चित्रपटगृह परिसरातील सीसीटीव्ही लावण्यास सांगण्यात आले आहे़ या चित्रपटगृहाच्या परिसरात ५० पोलीस अधिकारी व २५० हून अधिक कर्मचाºयांची बंदोबस्तावर नेमूणक करण्यात आली आहे़ चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याची शक्यता असलेल्यांना बोलावून त्यांना कायदा हातात न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे़
बांधकाम व्यावसायिक
देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून पळून गेलेला प्रमुख आरोपी राहुल शिवतारे याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाल्याने तपास पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी काल रात्री सिंहगड रोडवर तपासासाठी होते़ शिवतारे याला रात्री पकडले़ त्यानंतर हे सर्व अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात असतानाच मध्यरात्री १२ च्या सुमारास वायरलेसवरून या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळाली़ तातडीने हे सर्व अधिकारी व कर्मचारी तेथे गेल्याने आंदोलकांचा त्यांनी व्हिडिओ काढून तातडीने ताब्यात घेता आले़ न्यायालयात अटक केलेल्यांनी आम्ही फक्त रास्ता रोको आंदोलन केल्याचे सांगितले़ त्याचवेळी पोलिसांनी तोडफोड करीत असल्याचा व्हिडिओ असल्याचे सांगितले़ त्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली़

Web Title: Pune: 15 people detained for Padmavat, and 15 of Karani Sena arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.