पुण्यात रविवारी तब्बल १९४ जण कोरोनामुक्त होऊन घरी, १०२ कोरोनाबाधितांचीही झालीय वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:25 PM2020-05-10T21:25:25+5:302020-05-10T21:26:50+5:30

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठपर्यंत शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ससूनमध्ये उपचार घेणाºया १३ महिने वयाच्या बालकाचा समावेश आहे़

In Pune, 194 people returned home on Sunday after being released from coronation | पुण्यात रविवारी तब्बल १९४ जण कोरोनामुक्त होऊन घरी, १०२ कोरोनाबाधितांचीही झालीय वाढ 

पुण्यात रविवारी तब्बल १९४ जण कोरोनामुक्त होऊन घरी, १०२ कोरोनाबाधितांचीही झालीय वाढ 

Next

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असतानाच, दुसरीकडे सुखावह चित्र पाहण्यास मिळत असून, रविवारी तब्बल १९४ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ मात्र कोरोनाबाधितांची संख्याही आज १०२ ने वाढली असून, यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजार ४८२ इतकी झाली आहे़ यापैकी अ‍ॅक्टिव केसेसची संख्या ही १ हजार ३१८ इतकी आहे़ 
    
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठपर्यंत शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ससूनमध्ये उपचार घेणाºया १३ महिने वयाच्या बालकाचा समावेश आहे़ तर ससूनमध्ये उपचार घेणाºया ८२ वर्षीय व ३७ वर्षीय पुरूषांचा समावेश असून,औंध रूग्णालयातील ७० वर्षीय महिलेचा व नवले हॉस्पिटलमधील ५३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे़ पुणे शहरात आजपर्यंत कोरोनाबाधितांची मृत्यूची संख्या १४५ इतकी झाली आहे. गेल्या रविवारपासून पुणे शहरातील रूग्ण वाढीचा आकडा हा शंभरीच्या आसपासच असून, आजही (१० मे) दिवसभरात १०२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे़ सद्यस्थितीला शहरातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ९२ रूग्णांची प्रकृती गंभीर असून, यापैकी १७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ शहरातील एकूण रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११७, नायडू हॉस्पिटल व पालिकेने उभारलेल्या आयसोलेश सेंटरमध्ये ९१० तर खाजगी हॉस्पिटलमध्ये २९१ असे १ हजार ३१८ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
    
दरम्यान कोरोना संशयित असलेल्यांच्या तपासणीचे प्रमाणही शहरात वाढविण्यात आले असून, आज ९३८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ यापैकी १०२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ यामध्ये ९ जण ससून रू ग्णालयातील, ८१ जण नायडू व पालिकेच्या अन्य आयसोलेशन सेंटरमधील तसेच खाजगी हॉस्पिटलमधील १२ जणांचा समावेश आहे़

Web Title: In Pune, 194 people returned home on Sunday after being released from coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.