Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २४३ जणांची कोरोनावर मात तर २३६ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:27 PM2021-07-30T19:27:05+5:302021-07-30T19:27:13+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ५७७
पुणे : शहरात शुक्रवारी २३६ कोरोनाबाधित आढळून आले असून २४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ९७० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.३८ टक्के इतकी झाली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५७७ असून, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ७२ हजार ८३९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी ४ लाख ८६ हजार ९०५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार ५६७ जण झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७६१ जणांचा मृत्यू झाला आहे.