‘पुणेरी पाट्या प्रदर्शनात अवतरले पुणे-३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:05 AM2018-06-24T03:05:51+5:302018-06-24T03:06:02+5:30

‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडताना आशयसंपन्न विचारांचा जणू आरसाच ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक

Pune-30 in 'Puneer Pataya Exhibition' | ‘पुणेरी पाट्या प्रदर्शनात अवतरले पुणे-३०

‘पुणेरी पाट्या प्रदर्शनात अवतरले पुणे-३०

googlenewsNext

पुणे : ‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडताना आशयसंपन्न विचारांचा जणू आरसाच ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणांमधून प्रत्येकाच्या ओठांवर हास्याच्या लकेरी उमटत होत्या.
निमित्त होते ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर हिमोथेरपी क्लिनिक आणि खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे. : पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पाहण्यासाठी हजारो पुणेकरांनी प्रदर्शनाला भेट दिली. उत्स्फूर्त दाद देत पुणेरी पाट्यांची मजा अनुभवली.
‘अरे ही पाटी बघ ना, काय सॉलिड आहे रे’... ‘ही पाटी कुठेतरी वाचली आहे’... ‘खरच पुणेकर म्हणजे ना’... अशा संवादामधून रसिक ‘पुणेरी पाट्यां’चा मनमुराद आनंद घेत होते. अनेक ज्येष्ठांना या पाट्या पाहताना जुन्या आठवणींचा गहिवर येत होता. आजवर सोशल मीडियावर नुसत्याच पुणेरी पाट्या किंवा त्यासंबंधीचे विनोद फिरायचे पण खºया अर्थाने पुणेरी पाट्यांचे पहिले-वहिले प्रदर्शन ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केल्याबद्दल अनेकांनी दाद दिली. ‘पुणेरी पाट्यां’चा एकत्रितपणे आस्वाद घेत रसिक ‘पुणेरी पाट्यां’च्या विश्वात रमल्याचे चित्र दिसत होते. या पाट्यांमधून ‘अस्सल’ पुणेरीपणाचा अनुभव रसिकांना मिळाला.
‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुण्याच्या अभिमानाचा मानबिंदू. जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे पण कुणालाही न दुखावता मांडणे हे ‘पुणेरी पाट्यां’च्या शैलीचे खास वैशिष्ट्य. ‘दाराची बेल वाजविल्यावर दार उघडायला वेळ लागतोच, घरात माणसे राहतात स्पायडरमन नाही’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’ अशा नर्मविनोदी पाट्यांमधून पुणेकर रसिक खळखळून हसत होते. या पुणेरी पाट्या आता फारशा पाहायला मिळत नसल्यामुळे त्या संग्रही ठेवण्यासाठी काही पाट्या रसिक कॅमेºयात बंदिस्त करीत होते. कुणी या प्रदर्शनात पाट्यांसमवेत सेल्फी काढताना दिसत होते... ज्येष्ठांसह तरुणाईदेखील पाट्यांच्या विश्वात हरवली होती. ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाला रसिकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला. या पाट्या लिहिण्याची एक वेगळी शैली असल्याने पुणेकर रसिकांनाही एका वॉलवर ‘पुणेरी पाटी’ लिहिण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही रसिकांनी उचलून धरले... शब्दांच्या गुंफणीतून ‘पुणेरी पाट्या’ लिहिण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता.
प्रदर्शनात रात्रीपर्यंत रसिकांच्या गर्दीचा ओघ सुरूच होता. उद्या (रविवारी) देखील हे प्रदर्शन विनामूल्य सकाळी ११ ते ८ या वेळेत पाहण्यासाठी खुले राहाणार आहे. आवर्जून या!... पुणेकरांचे स्वागत आहे.

पुणेरी पाट्यांची स्मरणगाथा
‘पुणेरी पाटी’ ही पुण्याची ओळख. पण, आजपर्यंत कधीही एकत्रितपणे प्रदर्शन भरलेले नाही. त्यामुळे ‘लोकमत’चे प्रदर्शन म्हणजे पुणेकरांसाठी स्मरणगाथा ठरली. मोबाईलमध्ये पाट्यांचे फोटो काढले जात होते. अनेक जण पाट्या लिहून घेत होते. हा ठेवा मनात साठवून घेत होते.
प्रदर्शनास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद सकाळपासूनच सुरू होता. दुपारनंतर तर रांगा लागल्या. आपल्या सृहृदांनाही पाट्यांचा आनंद द्यायचा असल्याने अनेक जण तेथून व्हॉट्सअ‍ॅप करत होते.
सहकुटुंब मनमुराद हसण्याचा आनंद ‘पुणेरी पाटी’ प्रदर्शनाने दिल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. अगदी ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत एकत्रितपणे प्रदर्शनाचा आनंद लुटला जात होता.

Web Title: Pune-30 in 'Puneer Pataya Exhibition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.