Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३६४ कोरोनाबाधित तर ३३१ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:33 PM2021-07-18T20:33:06+5:302021-07-18T20:33:35+5:30
तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ५.१५ टक्के इतकी आढळून आली आहे़
पुणे : शहरात रविवारी ३६४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ५८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ५.१५ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ९५४ इतकी असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २३६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४८५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ८५ हजार ७३२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८३ हजार ८८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार २४० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६९० जणांचा मृत्यू झाला आहे.