पुण्यात आरटीओकडून नियमावलीची पूर्तता न करणा-या ५२ स्कूल बस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:38 AM2017-11-04T02:38:41+5:302017-11-04T02:38:50+5:30

योग्य प्रमाणपत्र नसणा-या आणि नियमावलीची पूर्तता न करणा-या स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ७५ बसवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील ५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

In Pune, 52 school buses which were not fulfilling the rules of the RTO were seized | पुण्यात आरटीओकडून नियमावलीची पूर्तता न करणा-या ५२ स्कूल बस जप्त

पुण्यात आरटीओकडून नियमावलीची पूर्तता न करणा-या ५२ स्कूल बस जप्त

Next

पुणे : योग्य प्रमाणपत्र नसणा-या आणि नियमावलीची पूर्तता न करणा-या स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ७५ बसवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील ५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
आरटीओने शहर व उपनगरात गुरुवार आणि शुक्रवारी शालेय मुलांची वाहतूक करणाºया बसची विशेष तपासणी मोहीम हाती
घेतली होती. या कारवाईत साडेतीनशे वाहनांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी ७५ वाहने दोषी आढळली असून, ५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनचालक आणि मालकांकडून १ लाख २३ हजार ३०० रुपयांचा दंड आणि ६ हजार ५५९ रुपयांचा कर वसूल करण्यात आला.

Web Title: In Pune, 52 school buses which were not fulfilling the rules of the RTO were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे