पुणे : अंगावरील तब्बल 53 तोळे सोने लुटले, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:54 AM2017-12-23T06:54:50+5:302017-12-23T06:55:32+5:30
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना दोन व्यक्ती कात्रज बायपास चौकात थांबले आहेत व त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता कांबळे यांच्या पँटच्या खिशात एक प्लॅस्टिकची पिशवी आढळली. त्यामध्ये ५३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले. हे दोन आरोपी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले.
पुणे : मुलाच्या केस संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत, असे सांगून अंगावरील तब्बल ५३ तोळे सोने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ४ चेन, ३ ब्रेसलेट, २ अंगठ्या, विओ कंपनीचा मोबाईल असा १३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
या गुन्ह्यात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रणजित आनंदराव कांबळे (वय २५, रा. मु. पो भाळवणी, ता. पंढरपूर जि. सोलापूर) आणि सचिन हनुमंत कुरळे (रा. उघडेवाडी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.
शेलार यांच्या फिर्यादीनुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का? यासह फरारी तपास चालू असल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर. मोहिते, कृष्णा निढाळकर, चंद्रकांत फडतरे, प्रणव संकपाळ, उज्ज्वल मोकाशी, अमोल पवार, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, महेश मंडलिक, कुंदन शिंदे, अभिजित रत्नपारखी यांनी ही कामगिरी केली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना दोन व्यक्ती कात्रज बायपास चौकात थांबले आहेत व त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता कांबळे यांच्या पँटच्या खिशात एक प्लॅस्टिकची पिशवी आढळली. त्यामध्ये ५३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले. हे दोन आरोपी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले. फिर्यादी मुकेश शेलार यांची कर्वेनगर परिसरात ज्यूसची गाडी आहे, त्यांचा मुलगा एका खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. त्यामुळे मुलाच्या संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत, असे सांगून शेलार यांना बोलावून आरोपी व त्यांचे साथीदार तेजस जाधव, रामभाऊ डावरे व त्याचा मित्र यांनी मिळून त्याला गाडीत जबरदस्तीने पुणे-बंगलोर हायवेवर नेऊन चाकूचा धाक दाखवत, मुलाला ठार मारण्याची धमकी देत लुबाडले. त्यानंतर खेड शिवापूर येथे सोडून दिले.