Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ५४९ जणांची कोरोनावर मात, तर २९७ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 07:56 PM2021-06-06T19:56:43+5:302021-06-06T19:57:38+5:30
विविध केंद्रांवर ५ हजार ८६८ संशयितांची तपासणी, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ५.०६ टक्के
पुणे: शहरात रविवारी दिवसभरात नव्याने २९७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ५४९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ हजार २९५ इतकी आहे.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ८६८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.०६ टक्के इतकी आहे. तर आज २५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७७ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ३०९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ६६२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ३८ हजार ९९८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७२ हजार २५४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५९ हजार ५६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ३९५ जणांचा मृत्यू झाला आहे.