Pune: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ९०० पानी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 08:57 PM2024-07-26T20:57:50+5:302024-07-26T20:58:04+5:30

Pune Porsche Accident Case: कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  

Pune: 900 pani preliminary chargesheet filed in Pune Porsche accident case   | Pune: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ९०० पानी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल  

Pune: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ९०० पानी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल  

पुणे - कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  सीसीटीव्हीचे पंचनामे, टेक्निकल पुरावे, ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, एफएसएलने दिलेले अहवाल ही पोलिसांनी दिले आहेत.
  पोलिसांनी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०), शिवानी अग्रवाल (वय दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक बाशा मकानदार, अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध  दोषारोपपत्र दाखल केले आहे.

कल्याणी नगर भागात १९ मे च्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालविलेल्या पोर्शे कार च्या धडकेत आयटी अभियंता अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडविले. यात दोघे जागीच ठार झाले. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाल न्याय मंडळाने मुलाला तत्काळ जामीन देताना निबंध लिहिण्यास सांगितल्याने समाजमध्यमात टीकेची झोड उठली होती. यादरम्यान मुलाच्या आई वडिलांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या कटात  ससूनच्या डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. या पाच जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्रानुसार, पोर्शे प्रकरणात  ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे, यात प्रत्यक्षदर्शींच्या ही समावेश आहे.

आम्ही आरोपींविरुद्ध प्राथमिक दोषारोप पत्र दाखल केले आहे.  पुढील काही दिवसात १७३ (८) प्रमाणे पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येईल. डीएनए आणि इतर काही अहवाल येणे बाकी आहे. ते पुरवणी दोषारोपपत्र सोबत देण्यात येतील- शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)

Web Title: Pune: 900 pani preliminary chargesheet filed in Pune Porsche accident case  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.