धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरने ४ जणांना उडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 08:34 AM2024-06-29T08:34:52+5:302024-06-29T08:39:13+5:30

Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

pune accident news 14 year old boy driving tanker hit many people with tanker in vadavani pune | धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरने ४ जणांना उडवले

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरने ४ जणांना उडवले

Pune Accident ( Marathi News ) : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा वेगाने टँकर चालवत होता, या टँकरने अनेकांना उडवले आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. व्यायामासाठी निघालेल्या मुलांना या टँकरने धडक दिली. यात एका दुचाकी चालक महिलेलाही धडक दिली. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्या आहेत. हा टँकर १४ वर्षीय मुलगा चालवत होता, नागरिकांनी हा टँकरसह अल्पवयीन मुलाला अडवून ठेवले आहे.

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर स्विफ्ट आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक ; ६ जागीच ठार

पुण्यात काही दिवसापूर्वीच कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना उडवले होते, या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता हा दुसरा अपघात घडला आहे. 

पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर  असून  बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 

अल्पवयीन मुलाच्या आत्याने पूजा जैन यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे ‘पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कारचालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. त्यावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्यावर बाल न्याय मंडळाने आदेशात दुरुस्ती करून या मुलाची रवानगी ५ जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात केली. नंतर मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव १२ जूनपर्यंत आणि त्यानंतर २५ जूनपर्यंत सुधारगृहातील मुक्काम वाढविला होता.

Web Title: pune accident news 14 year old boy driving tanker hit many people with tanker in vadavani pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.