पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 09:11 AM2024-07-06T09:11:50+5:302024-07-06T09:12:16+5:30

बाल न्याय मंडळाकडे वाहतूक प्रश्नांवर निबंध दिला लिहून, पुणे पोलिसांनी या निर्णयावर सत्र न्यायालयात दाद मागितल्यानंतर मुलाचा जामीन रद्द करून त्याला बाल न्याय मंडळाने बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला

Pune Accident: Porsche driver says in essay... 'Don't run away after an accident'; Read what is written | पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा

पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा

पुणे : ‘सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, ते करणे का आणि कसे आवश्यक आहे, तसेच सामाजिक सुरक्षेसाठी किती गरजेचे आहे, हे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाने निबंधातून सांगितले. बाल न्याय मंडळाकडे त्याला वाहतूक प्रश्नांवर निबंध सादर करण्याची शिक्षा दिली होती. हा निबंध मुलाने अखेर सादर केला.  

कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी मध्यरात्री अल्पवयीन मुलाच्या कारच्या  धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसाायिक विशाल अग्रवालच्या मुलाला ताब्यात घेऊन येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १५ तासांत मुलाला वाहतूक प्रश्नावर तीनशे शब्दांचा निबंध सादर करण्याबरोबरच, पोलिसांसोबत चौकात काम करावे आणि व्यसन सुटण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशा अटींवर जामीन मंजूर केला. या निर्णयावर टीकेची झोड उठली. पुणे पोलिसांनी या निर्णयावर सत्र न्यायालयात दाद मागितल्यानंतर मुलाचा जामीन रद्द करून त्याला बाल न्याय मंडळाने बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी मुलाला महिनाभर बाल सुधारगृहात ठेवले.  

मुलाला बेकायदा डांबल्याचा पोलिसांवर आरोप करून मुलाची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या न्या. भारती डोंगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांनी मुलाला सुधारगृहातून मुक्त करावे, असा आदेश दिला. सुटका करताना न्यायालयाने बाल न्याय मंडळाने सुरुवातीला जामीन देताना घातलेल्या अटी कायम ठेवल्या. निबंध सादर केल्यानंतर मुलाला पंधरा दिवस वाहतूक पोलिसांबरोबर चौकात वाहतूक नियोजन करावे लागणार आहे.

निबंधात काय लिहिले?

‘माझ्याकडून अपघात झाल्यानंतर मला पोलिसांची भीती वाटत होती. त्यामुळे मी पळून जाण्याच्या मानसिकतेत होतो. लोकांनी मला मारले. तुमच्याकडून  अपघात झाला, तर पळून जाऊ नका. जवळच्या पोलिस स्टेशनला जा. तिथे शरण या. पोलिस बाकीच्या गोष्टी करतील. पळून जाऊन नका; अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. पीडित व्यक्तीला शक्य तितकी मदत करा,’ 

 

Web Title: Pune Accident: Porsche driver says in essay... 'Don't run away after an accident'; Read what is written

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.