Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील १३ आरोपींची निर्दोष मुक्तता

By नम्रता फडणीस | Published: March 29, 2024 07:54 PM2024-03-29T19:54:16+5:302024-03-29T19:55:06+5:30

Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींची वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्हयात मूळ 14 आरोपी होते.

Pune: Acquittal of 13 accused in the notorious double murder case in Lonavala city | Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील १३ आरोपींची निर्दोष मुक्तता

Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील १३ आरोपींची निर्दोष मुक्तता

- नम्रता फडणीस 
 पुणे - लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींची वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्हयात मूळ 14 आरोपी होते. मात्र मुख्य आरोपी किसन परदेशी याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्हयातील 13 आरोपी निर्दोष सुटले आहेत.

लोणावळा शहरातून राजेश भारत पिंपळे (वय-२९, रा. कैलास नगर लोणावळा)  व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड (वय-२७ रा. लोणावळा ता. मावळ जि. पुणे)  हे दोघे दि. १८ जुलै २०१५ पासून बेपत्ता झाले होते. दि. २० जुलै रोजी अक्षयचे वडील श्रीपाल श्रवण गायकवाड (रा. सिध्दार्थ नगर, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात मनुष्य मिसिंगची तक्रार दिली होती.

लोणावळा शहर पोलिस करीत असताना राजेश भारत पिंपळे आणि अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड या दोघांना लोणावळा शहरातील आरोपी किसन नथू परदेशी (रा. गावठाण, लोणावळा ता. मावळ) याने अंडा भुर्जीच्या गाडीच्या जागेवरून व जागेच्या भाड्यावरून झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून वरील दोन्ही मुलांना बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये बसवून कुठेतरी घेऊन जाऊन त्यांचा खून करून, दोघांची प्रेतं मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात खोल दरीत फेकून देऊन, खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानंतर  लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दि. ४ ऑगस्ट २०१५ रोजी खुनाचा कट कारस्थान करून पळवून नेऊन खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि १८ सप्टेंबरला किसन परदेशी व त्याचे साथीदार आरोपी शारदा उर्फ आप किसन परदेशी (वय-४९), यास्मिन लतीफ सैयद
(वय-३६), अजय कॄष्णण केसी (वय-२२), अश्विन चंद्रकांत शिंदे (वय-२९) , सुनील बाबू पटेकर (वय-४९), विकास उर्फ गोग्या सुरेश गायकवाड (वय-२४),
जगदीश उर्फ जग्गू मोरे, सादिक इब्राहिम बंगाली, विनायक उर्फ विनय ढोरे,आकाश सतीश चांडिल्य, ब्रिजेश उर्फ बंटी डावरे, सलीम शेख, सुभाष उर्फ महाराज गोविंद धाडगे या १४ आरोपींना संशयावरून लोणावळा शहर पोलिसांनी दोघांच्या खून प्रकरणी अटक केली होती.

लोणावळा शहर पोलिसांनी सखोल तपास करीत या खुनाच्या गुन्ह्यात एकूण १४ आरोपींच्या विरोधात वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने पुण्यातील ॲड मिलिंद द. पवार, ॲड. झाहिद कुरेशी, ॲड.अतुल गायकवाड, ॲड. अनिकेत जांभूळकर, ॲड. सूरज देसाई, ॲड.विनायक माने, ॲड.व्ही.आर. राऊत, ॲड.आर.जी.कांबळे यांनी काम पाहिले. खटला गंभीर स्वरुपाचा असल्याने खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली होती. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात १४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.  आरोपींना लोणावळा शहर पोलिसांनी न झालेल्या खुनाच्या खटल्यात विनाकारण गोवले असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: Pune: Acquittal of 13 accused in the notorious double murder case in Lonavala city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.