पुणे : रेल्वेची अडेलतट्टू भूमिका ; मालधक्का बंदविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:49 AM2017-12-23T06:49:45+5:302017-12-23T06:50:08+5:30

अचानक बंद केलेला पुणे रेल्वे मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने बाजार बंद ठेवून शुक्रवारी मोर्चा काढला होता.

Pune: Adverse role of Railways: Front against the Maldhaka bandh | पुणे : रेल्वेची अडेलतट्टू भूमिका ; मालधक्का बंदविरोधात मोर्चा

पुणे : रेल्वेची अडेलतट्टू भूमिका ; मालधक्का बंदविरोधात मोर्चा

googlenewsNext

पुणे : अचानक बंद केलेला पुणे रेल्वे मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने बाजार बंद ठेवून शुक्रवारी मोर्चा काढला होता.
अकरा दिवसांपासून हमाल आणि हुंडेकºयांचे धरणे आंदोलन सुरू आहे; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावर निघालेल्या मोर्चानंतरही रेल्वे व्यवस्थापकांनी आपली अडेलतट्टू भूमिका कायम ठेवली. मालधक्का कधी चालू करू, याबद्दल काहीही सांगण्यास असमर्थतता व्यक्त केली. पुढील ३ दिवसांच्या रेल्वे कार्यालयाच्या सुट्यांनंतर मंगळवारी २६ डिसेंबरला, सकाळी ११ वाजता रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावरील सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
आज सकाळी ११ वाजता मालधक्का येथून मोर्चा निघाला. मोर्चात हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट व डॉक वर्कर्स युनियन व हुंडेकरी असोसिएशन संघटना सहभागी होत्या. ससून, जिल्हाधिकारी कचेरी, पुणे स्टेशनमार्गे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावर आला. मोर्चात ‘मालधक्का पुन्हा सुरू झालाच पाहिजे, हमालांना रोजगार-हुंडेकºयांना व्यापार मिळालाच पाहिजे, पुण्याचा व्यापार वाढवा-धक्का पुन्हा सुरू करा, धक्का अचानक बंद करणाºया रेल्वे व्यवस्थापकांचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना नितीन पवार, राजेंद्र तरवडे, मधुकर भोंडवे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी रेल्वे प्रशासनाशी जिल्हा प्रशासन बोलेल व मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, असे मुठे म्हणाले.
रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्याशी वरील शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावर रेल्वे रुळानजीक झोपड्या काढल्यानंतर रेल्वेरुळांची डागडुजी करू. नंतरच धक्का चालू होईल. ११ डिसेंबरच्या चर्चेदरम्यानचीच भूमिका देऊसकरांनी मांडली. पयार्यी कसलीही व्यवस्था नसल्याचे ते म्हणाले.
रेल्वे अधिकारी तालेवाराप्रमाणे वागत आहेत. त्यांना गरीब हमालांविषयी कसलीही कणव नसून आपलाच हेका ते चालवत आहेत. रेल्वे मार्गाच्या बाजूला फक्त पुण्यातच झोपड्या आहेत का? आणि त्या एका दिवसात झाल्यात का? झोपड्या होताना रेल्वे अधिकारी काय झोपा काढत होते? असे बिनकामाचे विभागीय व्यवस्थापक कार्यालय बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
- डॉ. बाबा आढाव

Web Title: Pune: Adverse role of Railways: Front against the Maldhaka bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे