करपा, तांबेरा आणि खोडकिडा रोगांमुळे भातपिकावर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:43 AM2018-09-28T00:43:57+5:302018-09-28T00:45:15+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.
तळेघर - आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व परिसर भातशेतीचे आगर समजले जाते. पुणे जिल्ह्यातील एकूण ६३,८०० हेक्टर भात क्षेत्रापैकी ५,१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी हा रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेवर पेरण्या करतो. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवानी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये काही ठिकाणी धूळवाफेवर, तर काही ठिकाणी चिडवाफेवर पेरण्या उरकून घेतल्या.
गत वर्षीपेक्षा चालू वर्षी रोहिणी व मृग या नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भातपेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड झालेला दाणा उगवून येऊन भातरोपे चांगल्या प्रकारे तरारल्याने आदिवासी शेतकºयांनी लागवडी उरकून घेतल्या. यानंतर या भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भातरोपे सडून गेली, तर काही ठिकाणी बांध फुटून भातखाचरे गाडली गेली.
तिन्ही खोºयांमध्ये भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने या रोगांनी ग्रासल्याने पिक पिवळे व तांबडे पडून जळून गेले आहे.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातपिके जळू लागली आहेत. हे रोग पडल्यानंतर पुढील लक्षणे जाणवत आहेत.या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा १२ महिन्यांतून भात हे एकमेव पीक घेतो.
भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. कित्येक वर्षांपासून निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बारा महिने मोठ्या आशेने काबाडकष्ट करून ऐन वेळी होणाºया निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने ग्रासल्याने सगळीकडे भातरोपे तांबडी-पिवळी पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरापासून पावसाने या भागातून काढता पाय घेतला आहे. सद्य:स्थितीमध्ये या भागात भातपिकासाठी दोन ते तीन वेळा पावसाची आवश्यकता आहे. या एक ते दोन दिवसांमध्ये जर वेळेत पाऊस झाला नाही, तर एकीकडे रोगांनी ग्रासलेले आहे.