Pune Airport : बॅग तपासणी यंत्रणेमुळे विमान प्रवाशांच्या वेळेची होणार बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 01:11 PM2024-12-09T13:11:29+5:302024-12-09T13:11:46+5:30
आता प्रवाशांचा पुणे विमानतळावरील चेक इनसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
पुणे : लोहगाव विमानतळावर बॅग तपासणीमुळे प्रवाशांचा वेळ जात होता. मात्र, विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक दोन बॅग तपासणी मशीन बसविली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
विमान प्रवासात सुरक्षित बॅग तपासणी होणे आवश्यकच आहे. मात्र, या तपासणीसाठी लागणारा वेळ, त्यामुळे होणाऱ्या गर्दीला प्रवासी वैतागले आहेत. सर्व तपासण्यांसाठी तासंतास रांगेत थांबावे लागत होते. एवढेच नव्हे तर त्यांना एक ते दोन तास अधी विमानतळावर पोहोचावे लागत होते. मात्र, आता प्रवाशांचा पुणे विमानतळावरील चेक इनसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
पुणे विमानतळावर प्रवाशांच्या बॅगांच्या तपासणीसाठी दोन अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या मशीन बसवल्या आहेत. या मशीन एका तासात सुमारे अकराशे ते बाराशे बॅगांची तपासणी करू शकतात. त्यामुळे प्रवाशांचे बॅगा तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.