दिवाळीनंतर पुणे विमानतळ १५ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:34+5:302021-09-10T04:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी पुणे विमानतळ दिवाळीनंतर १५ दिवस प्रवासी वाहतुकीकरिता संपूर्णपणे बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी पुणे विमानतळ दिवाळीनंतर १५ दिवस प्रवासी वाहतुकीकरिता संपूर्णपणे बंद असणार आहे. संरक्षण मंत्रायलयाने याबाबतचे पत्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने पाठविले. याबाबत अद्याप निर्णय जाहीर झाला नसला, तरीही १५ दिवस पुणे विमानतळ बंद होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुरुस्तीची नेमकी तारीख अद्याप निश्चत झालेली नाही.
पुणे विमानतळावर २६ ऑक्टोबर २०२० पासून धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू झाले. सुरुवातीला विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नंतर तो रद्द करून रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतूक बंद करून त्या वेळेत धावपट्टीचे काम केले जात. मात्र, वर्षभर काम करूनही अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झाले नाही. शेवटी संरक्षण मंत्रालयाने पुणे विमानतळ १५ दिवस पूर्णपणे बंद करून त्या दरम्यान धावपट्टीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी ही कामे करण्याचा निर्णय घेतला असता तर सण उत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असती. त्यामुळे प्रशासनाने दिवाळीनंतर पुणे विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्याचा विचार केला.
बॉक्स १
नेमकी दुरुस्ती कसली ?
पुणे विमानतळाची धावपट्टी ही जवळपास ८ हजार फूट लांबीची आहे. या ठिकणी कोविड पूर्वी दररोज १८० देशांतर्गत उडणारी १८० विमान येत आणि जात. आता संख्या ५० ते ५५ इतकी झाली. विमान टेक ऑफ किंवा लॅंडिंग करताना विमानांच्या चाकांचे धावपट्टीवर घर्षण होते. त्याचा परिणाम म्हणून धावपट्टीची झीज होते. त्यामुळे यासह अन्य काही कामाकरिता धावपट्टी दुरुस्ती करणे गरजेचे बनले. शिवाय या ठिकाणी काही वेळा विमांनाच्या चाकावरील छोटे रबरचे तुकडे आणि छोटे खडेही आढळले. हे जर इंजिनमध्ये गेले तर विमानांची पर्यायाने प्रवासी सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धावपट्टीची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.