Pune Airport: पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव; प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

By राजू इनामदार | Published: September 23, 2024 06:47 PM2024-09-23T18:47:46+5:302024-09-23T18:49:42+5:30

प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे गेल्यावर लगेच मंजुरी मिळून विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रचलित होईल

Pune Airport is named after Sant Tukaram Maharaj The proposal was approved in the state cabinet meeting | Pune Airport: पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव; प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

Pune Airport: पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव; प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

पुणे : लोहगाव विमानतळ अशीच आजपर्यंत ओळख असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आता ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशी होणार आहे. असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारच्या बैठकीत मान्यता दिली. केंद्रीय सहकार तसेच नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेला हा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात दिले होते.

मोहोळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव देण्याचे भाग्य मिळाले ही फार मोठी आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. लोहगाव हे संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते. त्यांच्या प्रत्येक कीर्तनात लोहगावमधील चार टाळकरी असायचे. त्यामुळे या विमानतळाचे असे नामकरण करण्यामागे औचित्यही आहे. या विमानतळाला यातून एक वेगळी ओळख मिळणार आहे.

हा प्रस्ताव मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन दिला. त्यांनी याला लगेचच संमती दिली. त्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे जाईल. तिथेही मंजुरी मिळून लगेचच या विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रचलित होईल, असे मोहोळ म्हणाले.

Web Title: Pune Airport is named after Sant Tukaram Maharaj The proposal was approved in the state cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.