Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

By नितीन चौधरी | Published: July 8, 2024 05:20 PM2024-07-08T17:20:39+5:302024-07-08T17:21:35+5:30

सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात असून नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा

pune airport new terminal operational from Sunday Success to Muralidhar Mohol efforts | Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल रविवारपासून (दि. १४) सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतकू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात असून नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु होती. याबाबत मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावर सीआयएसएफचे जवान दाखल होत असून नव्या टर्मिनलमध्ये इनलॅंड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. याची तांत्रिक ही प्रक्रिया वेगाने सुरू असून ती तातडीने पूर्ण केली जात आहे. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारपासून (दि. १४) नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे.”

मोहोळ यांच्या हस्ते पहिला बोर्डिंग पास

नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या प्रवाशाला १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित करणार आहेत.

Web Title: pune airport new terminal operational from Sunday Success to Muralidhar Mohol efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.