Maharashtra Winter : पुण्यात हुडहुडी..! राज्यभर थंडीचा कडाका जाणवणार

By श्रीकिशन काळे | Published: November 25, 2024 08:52 PM2024-11-25T20:52:46+5:302024-11-25T20:54:41+5:30

पुणे : सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये १२ अंशावरून तापमान १० अंशावर नोंदवले ...

Pune and The cold will be felt throughout the Maharashtra Winter | Maharashtra Winter : पुण्यात हुडहुडी..! राज्यभर थंडीचा कडाका जाणवणार

Maharashtra Winter : पुण्यात हुडहुडी..! राज्यभर थंडीचा कडाका जाणवणार

पुणे : सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये १२ अंशावरून तापमान १० अंशावर नोंदवले जात आहे. सोमवारी (दि.२५) तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही आतापर्यंत या हंगामातील निचांकी तापमान आहे. पुण्यातही सोमवारी ‘एनडीए’ भागात १० अंशावर तापमान होते.

हवामान विभागानुसार पुढील काळामध्ये देखील राज्यातील अनके भागातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढेल, असा इशारा देण्यात आला. राज्यावर हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ-उतार होत आहे. हवेच्या दाबामध्ये वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढत आहे. ईशान्येकडून येणारे थंड वारे थंडीची तीव्रता अधिक वाढवणार आहेत, असाही अंदाज देण्यात आला.

राज्यात हवामान कोरडे व थंड राहणार असून, सकाळी धुके पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपेक्षाही कमी आहे. तर १३ अंशांपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणांचीही संख्या लक्षणीय आहे.


पुण्यात हुडहुडी !

पुण्यात सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. कमाल तापमान ३० अंशाच्या खाली आले असून, किमान तापमान १० ते १२ अंशावर नोंदवले जात आहेे. ‘एनडीए’ आणि तळेगाव भागात १० अंशावर किमान तापमान होते, तर माळीण ११.१, शिरूर ११.०, शिवाजीनगर १२.१, हडपसर १४.२, कोरेगाव पार्क १६.२, मगरपट्टा येथे १८.१ किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यातील किमान तापमान

पुणे : १२.१

जळगाव : १२.४

कोल्हापूर : १६.७

महाबळेश्वर : १२.०

नाशिक : १२.०

सांगली : १५.७

सोलापूर : १५.६

मुंबई : २३.०

परभणी : १२.७

नागपूर : १३.० 

Web Title: Pune and The cold will be felt throughout the Maharashtra Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.