महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे राज्यात आघाडीवर; गाठला लाखांचा टप्पा

By नितीन चौधरी | Published: May 13, 2023 05:41 PM2023-05-13T17:41:35+5:302023-05-13T17:41:50+5:30

पुणे परिमंडलातील पुणे शहरात ५३ हजार २७३ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी

Pune at the forefront of Mahavitaran Go Green scheme Reached the milestone of lakhs | महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे राज्यात आघाडीवर; गाठला लाखांचा टप्पा

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे राज्यात आघाडीवर; गाठला लाखांचा टप्पा

googlenewsNext

पुणे : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करीत पुणे परिमंडलातील एक लाख पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडला आहे. यामुळे महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजने अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी आहे. परिणामी या वीजग्राहकांची तब्बल एक कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

गेल्या फेब्रुवारीपासून या योजनेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या पर्यावरणस्नेही ७ हजार १९४ वीजग्राहकांची भर पडली आहे. राज्यात ३ लाख ८७ हजार ७५७ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये पुणे परिमंडलामध्ये सर्वाधिक १ लाख ७ त्यानंतर कल्याण- ४२ हजार २१४ व भांडूप परिमंडलामध्ये ३७ हजार ३९६ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.

पुणे परिमंडलातील पुणे शहरात ५३ हजार २७३ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-१ उपविभागामधील ६ हजार ५०, वडगाव धायरी- ५ हजार १८४, धनकवडी– ४ हजार ९००, औंध- ४ हजार ३६५ आणि विश्रांतवाडी उपविभागामध्ये ३ हजार ८५७ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सहभागी २९ हजार २०५ वीजग्राहकांमध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ९ हजार ४२, चिंचवड ५ हजार ६६१ आणि आकुर्डी ५ हजार ५२५ ग्राहकांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण मंडलांतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १७ हजार ५२९ ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४ हजार ७१२ वीजग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे. या योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

''समृद्ध पर्यावरणासाठी 'गो-ग्रीन' योजना काळाची गरज आहे. ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल, भरणा तसेच मासिक वीज वापर आदींची माहिती महावितरण मोबाईल ऍप व वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून या योजनेत आणखी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे. - राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल'' 

Web Title: Pune at the forefront of Mahavitaran Go Green scheme Reached the milestone of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.