पुणे : लॉकअपमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न, लष्कर पोलीस ठाण्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:12 AM2018-01-23T06:12:35+5:302018-01-23T06:13:38+5:30
हा प्रकार लष्कर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला.
पुणे : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या अंगावर घेण्याच्या चादरीची किनार कापून तिच्यासाह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लष्कर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास
घडला.
जिलाणी मोहम्मद रफिक दामटी (वय २३, रा़ लक्ष्मीनगर, येरवडा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार किसन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामटी याला लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या वेळी त्याने लॉकअपमधील अंगावर घेण्यासाठी ठेवलेल्या चादरीची किनार फाडून घेतली. त्या साह्याने लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.