पुणे बार असोसिएशनतर्फे १०० वकिलांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:07+5:302021-04-27T04:12:07+5:30
पुणे : पुणे बार असोसिएशनतर्फे ४५ वर्षांवरील १०० वकिलांचे लसीकरण करण्यात येणार असून, येत्या गुरुवारी (दि. २९) किंवा शुक्रवारी ...
पुणे : पुणे बार असोसिएशनतर्फे ४५ वर्षांवरील १०० वकिलांचे लसीकरण करण्यात येणार असून, येत्या गुरुवारी (दि. २९) किंवा शुक्रवारी (दि. ३०) न्यायालयातील बार रूममध्ये हे लसीकरण केले जाणार आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वकील वर्गाला सतत लोकांच्या संपर्कात राहून काम करावे लागत असल्यामुळे वकिलांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत पुणे बार असोसिएशनने वकिलांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. लसीकरणाबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली असून, त्यांनी १०० वकिलांना लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यातील ७० जणांची नोंदणी झाली असून, आणखी ३० जणांची नोंदणी करण्यात येणार आहे. उद्यापर्यंत उर्वरित ३० नावे नोंदवली जातील. त्यानुसार येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत ४५ वर्षावरील वकिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. न्यायालयातील सेंट्रल बार रूममध्ये याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मुळीक यांनी सांगितले.