राज्यात पुणे ठरले सर्वात थंड शहर ; 'ही' आहे त्यामागची राज की बात..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 10:54 AM2021-02-05T10:54:17+5:302021-02-05T10:56:00+5:30

राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १०.३ अंश सेल्सिअस बुधवारी नोंदविले गेले.

Pune became the coldest city in the state; 'This' is the secret behind it. | राज्यात पुणे ठरले सर्वात थंड शहर ; 'ही' आहे त्यामागची राज की बात..

राज्यात पुणे ठरले सर्वात थंड शहर ; 'ही' आहे त्यामागची राज की बात..

googlenewsNext
ठळक मुद्देभौगोलिक कारण, पाणीसाठा, हिरवळीचा होतो परिणामपुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जाेर वाढल्याने राज्यातील बहुतांश शहरातील तापमानाचा पारा घसरला आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम नेहमी पुण्यात अगोदर दिसून येतो, याचा प्रत्यय सध्या पुणेकर घेत आहे. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १०.३ अंश सेल्सिअस बुधवारी नोंदविले गेले. पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, तर मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानाच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागात किमान तापमान जास्त असताना पुण्यातच रात्रीचे तापमान कमी होण्यामागचे नेमके कारण काय, असे विचारता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, पुण्याचे किमान तापमान कमी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुण्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. पुणे शहराची रचना ही बशीसारखी आहे. शहराच्या चारही बाजूला टेकड्या आहेत. दिवसा जमीन तापलेली असते. सायंकाळनंतर ही हवा वर जाण्यास सुरुवात होते. त्याचवेळी टेकड्यांवरील थंड हवा जड होऊन खाली येते. आजू बाजूला झाडे व पाणीसाठा मोठा असेल तर हवा तापण्याचे प्रमाण कमी होते. त्यात टेकडीवरुन आलेली थंड हवा याचा एकत्रित परिणाम होऊन रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा कमी होते. त्यामुळे पुणे शहरातील किमान तापमान कमी असले तरी लोहगावचे किमान तापमान शिवाजीनगरपेक्षा अधिक जाणवते. तसेच पर्वतीवरही उबदारपणा जाणवतो. कधी कधी महाबळेश्वरपेक्षा पुण्यात किमान तापमान कमी असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती आपल्याला नाशिक व निफाड या जवळच्या दोन शहरांमध्ये दिसते. नाशिकपेक्षा निफाडचा पारा अधिक खाली घसरलेला दिसून येतो.

आता सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याने उष्णता वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल. 

Web Title: Pune became the coldest city in the state; 'This' is the secret behind it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.