पुणे ठरला सर्वाधिक कोरोनामुक्तांचा जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:11+5:302020-12-07T04:09:11+5:30
निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीत सर्वाधिक कोरोनाबाधित असल्यामुळे राज्यासह देशातही हॉट स्पॉट ठरलेले पुणे हे ...
निलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीत सर्वाधिक कोरोनाबाधित असल्यामुळे राज्यासह देशातही हॉट स्पॉट ठरलेले पुणे हे आज ,राज्यातील इतर जिल्ह्यांची तुलना करता सर्वाधिक कोरोनामुक्त होणारा जिल्हा म्हणून केंद्राच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर अग्रभागी दिसून येत आहे़
आजमितीला सर्वाधिक सक्रिय रूग्णही (अॅक्टिव्ह रूग्ण) राज्यात पुणे जिल्ह्यातच असून ही संख्या २० हजार २१५ इतकी आहे़ राज्यातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी एकट्या पुणे जिल्ह्यात २२़ ६८ टक्के रूग्ण आहेत़ तर जिल्ह्यात मुंबई पाठपोपाठ आत्तापर्यंत साधारणत: प्रति दहा लाख नागरिकांमागे सर्वाधिक तपासणी ही झाली असून, पुण्यात दहा लाख रूग्णांमागेनागरिकांमागे १ लाख ४१ हजार ७५ इतकी तपासणी होत आहे़ राज्याची तुलना करता पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२़ १७ टक्के आहे़ तर राज्याचे हेच प्रमाण ९२़ ४९ इतके आहे़
राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील रिकव्हरी रेट पाहता सर्वाधिक कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पालघर जिल्ह्यात असून ते ९६़ ८६ टक्के आहे़ तर कमी प्रमाण हे चंद्रपूर जिल्ह्यात असून येथे हे प्रमाण ८७़ ४६ टक्के इतके आहे़ ३५ जिल्ह्यांची सरासरी काढली असता राज्याचा रिकव्हरी रेट हा ९२़ ४९ टक्के इतका आहे़
कोरोनाचा संसर्गाचा प्रभाव जास्त असताना म्हणजेच जुने जुलेै महिन्यात राज्यात साधारणत: ५३ टक्के अॅक्टिव्ह रूग्ण होते़ मात्र आजमितीला राज्यात सरासरी (१ डिसेंबरपर्यंत) केवळ ५ टक्के अॅक्टिव्ह रूग्ण असून, पुण्यात ते सुमारे ७ टक्के आहे़
---------------
फोटो मेल केले आहेत : सर्व आलेख आहेत़