पुणे - लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी मेगा ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 09:02 PM2018-03-09T21:02:30+5:302018-03-09T21:02:30+5:30
पुणे : मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे : सिग्नल यंत्रणेतील सुधारणांसह इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी प्रगती व सिंहगड एक्सप्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० यावेळेत राहणार आहे. सिग्नल यंत्रणेतील सुधारणेमुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांची ये-जा अधिक सुलभपणे होणार आहे. त्यासाठी कामशेत ते तळेगाव दरम्यान असलेल्या आॅटोमॅटिक सिग्नल यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत. तसेच ब्लॉकच्या कालावधीत कामशेत व वडगाव दरम्यान असलेल्या पुलाच्या बांधणीसाठीचे आवश्यक काम केले जाईल. त्यामुळे या वेळेत रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस, मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस या गाड्या लोणावळा व कामशेत स्थानकादरम्यान १ तास २५ मिनिटांसाठी थांबविल्या जातील. तर मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी १ तास आणि हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला तब्बल ३ तास २५ मिनिटे थांबविले जाईल. मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसही पुणे ते देहूरोज दरम्यान २० मिनिटे थांबेल. पुणे स्थानकातून सकाळी ११.४५ वाजता सुटणारी भुसावळ एक्सप्रेस रविवारी दौंड-मनमाड यामार्गे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
-----------------
पुण्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा - सकाळी ६.३०, ६.५०, ८.५७, ९.५५, ११.२० (शिवाजीनगर), दुपारी १२.१५, १, ३, व ३.४०.
-----------------
लोणावळ््याहून सुटणाºया रद्द लोकलच्या वेळा - सकाळी ६.३०, ७.५०, ८.२०, ९.५७ (तळेगाव), १०.१०, ११.३०, दुपारी २, २.५०, ३.४०, ४.३८ (तळेगाव).