पुणे भाजपामध्ये राजीनाम्यांचा धडाका कायम राहणार; पुढचा नंबर कोणाचा याची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:57 PM2021-03-16T20:57:19+5:302021-03-16T20:59:37+5:30
आता पुढचा नंबर कोणाचा याची उत्सुक्ता आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पुणे : महापालिका निवडणुकीच्या एक वर्ष आधीच भाजपमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या राजीनाम्यांनंतर आता आणखी काही राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. एकूण चार टप्प्यांमध्ये हे राजीनामा सत्र होणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा याची उत्सुकता आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
निवडणुकीला काही दिवस महिने बाकी असतानाच आता भाजपने उपमहापौर पद आरपीआयला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष शंकर पवार यांना देखील राजीनामा द्यायला सांगण्यात आले आहे. मात्र पवार यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
यापाठोपाठच आता आणखी काही पदाधिकाऱ्यांना राजीनामा द्यायला लावण्यास येणार आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये चार टप्प्यांमध्ये हे पदाधिकारी बदल होणार असल्याचे भाजप मधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
यामध्ये महापालिकेतील पदाधिकाऱ्यांबरोबर शहर पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे या नेत्याने सांगितले. पण यातल्या बऱ्याच नियुक्त्या नुकत्याच झालेल्या असल्याने या राजीनामा प्रकरणात कोणाचा बळी जाणार याची चर्चा सध्या रंगली आहे.