पुणे : फिरोदिया करंडकावर ‘बीएमसीसी’ची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:27 AM2018-02-27T06:27:28+5:302018-02-27T06:27:28+5:30
नाट्य, कला, नृत्य, संगीत यांचे एकत्रिकरण असणारी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक होय. या फिरोदिया करंडक स्पर्धेत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय एकांकिका इतिहास गवाह हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय एकांकिका कि बो द्वितीय तर तृतीय क्रमांक सर परशुभाऊ महाविद्यालय एकांकिका सरयल यांनी मिळवला आहे.
पुणे : नाट्य, कला, नृत्य, संगीत यांचे एकत्रिकरण असणारी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक होय. या फिरोदिया करंडक स्पर्धेत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय एकांकिका इतिहास गवाह हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय एकांकिका कि बो द्वितीय तर तृतीय क्रमांक सर परशुभाऊ महाविद्यालय एकांकिका सरयल यांनी मिळवला आहे. फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेच्या अंतिम फेरीत नऊ महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. सर्व महाविद्यालयांनी अतिशय उत्साहात आणि जोशात या स्पर्धेत सादरीकरण केले. आणि तीन महाविद्यालयांनी बक्षीस मिळवून आपला मान मिळवला. सर्वोत्तम शिस्तप्रिय संघ म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांची आणि प्रथम फिरोदिया करंडक स्पर्धेत भाग घेतला म्हणून जवाहरलाल नेहरू अभियंत्रिकी महाविद्यालय यांची निवड करण्यात आली.
या फिरोदिया करंडक स्पर्धेत ३३ महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १.सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे एकांकिका- सरयल, २.विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे एकांकिका - कि बो, ३. महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे एकांकिका - झर्मिना, ४.पी.ई. एस मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकांकिका - मूक आक्रंदन, ५.श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे एकांकिका - नॉट अगेन, ६.मॉडर्न कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय पुणे एकांकिका - आहुती, ७. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकांकिका - प्लेअर टू, ८.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद एकांकिका - कथेकरी, ९. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे एकांकिका - इतिहास गवाह हे. या ९ महाविद्यालयीन संघाची निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीचे परीक्षण विश्वजीत जोशी, अद्वैत दादरकर, राधिका इंगळे, अरुंधती पटवर्धन, आशुतोष परांडकर यांनी केले. तर अंतिम फेरीचे परीक्षण संजय जाधव, मधुरा वेलणकर, कविता लाड, सुमित राघवण यांनी केले.