Alandi Palkhi Sohala: मोठी बातमी! माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या नगराध्यक्षांसह ३७ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 08:28 AM2021-07-02T08:28:45+5:302021-07-02T08:29:25+5:30

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala: आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी आदींची दोन दिवस कोविड - १९ ची चाचणी करण्यात आली आहे.

Pune Breaking: 22 Warkari Corona Positive with Alandi Mayor before sant dnyaneshwar maharaj palkhi sohala start | Alandi Palkhi Sohala: मोठी बातमी! माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या नगराध्यक्षांसह ३७ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

Alandi Palkhi Sohala: मोठी बातमी! माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या नगराध्यक्षांसह ३७ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका (sant dnyaneshwar maharaj palkhi) आज (दि.२) निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल ३७ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यापूर्वी एकच खळबळ उडाली आहे. (37 varkari got corona positive in sant dnyaneshwar maharaj palkhi sohala at alandi.)

आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी आदींची दोन दिवस कोविड - १९ ची चाचणी करण्यात आली आहे. कोविड चाचणी नंतर संबंधित वारकऱ्यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान संबंधित वारकऱ्यांच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर एकूण ३७ सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. 

दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Pune Breaking: 22 Warkari Corona Positive with Alandi Mayor before sant dnyaneshwar maharaj palkhi sohala start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.