पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:46 AM2023-10-12T11:46:14+5:302023-10-12T11:47:57+5:30

याप्रकरणी मुंबईतील बाफना मोटर्स प्रा. लि.च्या संचालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores pune latest crime news | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

पुणे : कंपनीसाठी तसेच रिअल इस्टेटसाठी पैशांची गरज असून, जर तुम्ही माझ्या कंपनीमध्ये रक्कम गुंतवली तर चांगला नफा अथवा रकमेच्या चौपट जागा देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील बाफना मोटर्स प्रा. लि.च्या संचालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रविराज रिॲलिटीचे मालक रवींद्र नौपातलाल साकला (रा. ढोले पाटील रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लि.चे संचालक सुमतीप्रसाद मिश्रीलाल बाफना (६२, रा. मरीन ड्राइव्ह, मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रविराज रिॲलिटी मिलेनियमच्या ढोले पाटील रोडवरील कार्यालयात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र साकला यांचा रविराज रिॲलिटी नावाने बांधकाम व्यवसाय आहे. तर आरोपी बाफना देखील व्यावसायिक आहेत. त्यामुळे साकला आणि बाफना यांची ओळख होती. मार्च २०२१ मध्ये बाफना हे रवींद्र साकला यांच्या पुण्यातील ढोले पाटील रोडवरील कार्यालयात आले. त्यांनी साकला यांना कंपनीसाठी आणि रिअल इस्टेटकरिता पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. तसेच बाफना यांनी साकला यांना जर आमच्या कंपनीत पैसे गुंतवले तर चांगला नफा अथवा गुंतविलेल्या रकमेच्या चौपट जागा देण्याचे आश्वासन दिले. साकला यांनी विश्वास ठेवून बाफना यांच्या कंपनीत २ कोटी ५० लाख रुपये गुंतवले. यानंतर बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नेवसे करत आहेत.

Web Title: Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.