Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा : सुनील कांबळे १०,३२० मतांनी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:20 PM2024-11-23T16:20:57+5:302024-11-23T16:22:57+5:30
Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live
Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांचा १०,३२० मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला आहे. ७६,०३२ मते मिळवत कांबळे यांनी मतदारसंघावर भाजपचा झेंडा पुन्हा फडकवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे ६५,७१२ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
अंतिम आकडेवारी
- सुनील कांबळे (भाजप): ७६,०३२ मते (+१०,३२० आघाडी)
- रमेश बागवे (काँग्रेस): ६५,७१२ मते
भाजपसाठी मोठा विजय
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही कांबळे यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. यंदाही मतदारांनी भाजपवर आपला विश्वास कायम ठेवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. २० व्या फेरीच्या अखेरीस बागवे यांना १०,३२० मतांनी कांबळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
काँग्रेसला फटका
काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी स्थानिक मुद्दे उपस्थित करत आणि जोरदार प्रचार करत मतदारसंघात काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या संघटित प्रचारयंत्रणेपुढे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा २०२४
भाजपचा पुण्यात दबदबा
सुनील कांबळे यांच्या विजयासह भाजपने पुण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांवर आपला कब्जा कायम ठेवला आहे. कसबा पेठ, पर्वती, शिवाजीनगर कोथरूड, खडकवासला, आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे.