पुणे : बंगल्यासाठी बनावट कागदपत्रांतून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:26 AM2018-02-12T05:26:26+5:302018-02-12T05:26:39+5:30
कॅम्प परिसरातील बंगला स्वत: च्या नावावर करण्यासाठी बनावट ना हरकत शपथ पत्र तयार करून, रिटायरमेंट डिडवर बनावट सह्या करीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : कॅम्प परिसरातील बंगला स्वत: च्या नावावर करण्यासाठी बनावट ना हरकत शपथ पत्र तयार करून, रिटायरमेंट डिडवर बनावट सह्या करीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गोफ नथुरमल विरवानी (वय ६८, रा़ निवेदिता टेरेस, केदारीनगर, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल विरवानी व दीपक विरवानी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल वीरवानी, दीपक वीरवानी आणि फिर्यादी गोफ वीरवानी हे तिघे भाऊ आहेत.
गोफ वीरवानी यांचा कॅम्प परिसरातील एल्फिन्स्टन रोड येथे बंगला आहे. त्यांच्या दोन्ही भावांनी २००४ मध्ये संगनमत करून स्वत:च्या फायद्याकरिता त्यांच्या बंगल्याच्या मालमत्तेमध्ये स्वत:ची नावे दाखल करण्याकरिता गोफ वीरवानी यांच्या नावे बनावट ना हरकत शपथपत्र तयार केले.
या शपथपत्रावर, तसेच २० मे १९७४ च्या रिटायरमेंट डिडवर बनावट सही करून फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यावर गोफ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.