Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 07:27 PM2021-08-08T19:27:33+5:302021-08-08T19:28:04+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६४० संशयितांची तपासणी करण्यात आली
पुणे : शहरात रविवारी २२० कोरोनाबाधित आढळून आले असून, ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६४० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.८७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार २०६ असून, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०२ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३५४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ४३ हजार ९६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८८ हजार ९०२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७७ हजार ८८३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला आहे.