Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:15 PM2021-06-13T18:15:11+5:302021-06-13T18:15:18+5:30
ऑक्सिजन सह उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारांच्या आत, आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के
पुणे: शहरात रविवारी २४२ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३८८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३ हजार २७ इतकी आहे.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ५३२ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.३७ टक्के इतकी आहे. तर आज १६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ५११ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ८२२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ७८ हजार ७७३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७४ हजार ११२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६२ हजार ६१० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.