Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ४ हजार ७५९ जणांची कोरोनावर मात, तर ४ हजार ६३१ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 07:50 PM2021-04-25T19:50:00+5:302021-04-25T19:51:16+5:30
शहरातील कोरोनमुक्तीचा आकडा तीन लाखांच्या पुढे
पुणे: पुणे शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या रविवारीही कायम असून, आज दिवसभरात ४ हजार ७५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तपासणी करण्यात आलेल्या २० हजार ३४८ जणांपैकी ४ हजार ६३१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २२.७५ टक्के इतकी आहे़. दरम्यान आज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाखाच्या पुढे गेली असून, ९ मार्च, २०२० पासून आजपर्यंत शहरात ४ लाख ११७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आज दिवसभरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के इतका आहे़. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६१९ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६९ रूग्ण हे गंभीर आहेत.
शहरात आत्तापर्यंत २० लाख ३४ हजार ५१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ११७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ४४ हजार ३३० कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५९ हजार २८९ इतकी झाली आहे़.