पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:39 PM2024-11-05T13:39:32+5:302024-11-05T13:40:16+5:30
शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या दिवशी अर्थात सोमवारी (दि. ४) जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज छाननीनंतर एकूण ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक २१ उमेदवार चिंचवड मतदारसंघात असून, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात २०, तर हडपसर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले आहेत. पुण्यातील बहुतांश मतदारसंघात खेळाडू जुने, सामने नवीन अशी परिस्थिती सद्यस्थितीत दिसते आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हडपसर, वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लक्षवेधी लढत होणार आहे. तर बहुचर्चित कसबा विधासनसभेत दोन जुने प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. अशातच य विधानसभा मतदार संघाच्या लढतीत मनसेही उतरल्याने तिरंगी लढत होणार असल्याचे दिसते आहे. शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत.
कसबा विधानसभा मतदार संघ
- आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस
- हेमंत रासने, भाजप
- गणेश भोकरे, मनसे
कोथरूड विधानसभा मतदार संघ
- आमदार चंद्रकांत पाटील,भाजप
- चंद्रकांत मोकाटे, शिवसेना उबाठा
- किशोर शिंदे, मनसे
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
- आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप
- दत्ता बहिरट, काँग्रेस
- मनीष आनंद, अपक्ष (काँग्रेस बंडखोर)
हडपसर विधानसभा मतदार संघ
- आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
- साईनाथ बाबर, मनसे
खडकवासला विधानसभा मतदार संघ
- आमदार भीमराव तापकीर, भाजप
- सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
- मयुरेश वांजळे, मनसे
वडगावशेरी विधानसभा मतदार संघ
- आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष
पर्वती विधानसभा मतदार संघ
- आमदार माधुरी मिसाळ,भाजप
- अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
- आबा बागुल, अपक्ष (काँग्रेस बंडखोर)
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ
- आमदार सुनील कांबळे, भाजप
- रमेश बागवे, काँग्रेस.