पुणे तिथे काय उणे! 'पादचारी दिन' साजरा करण्यात देशात ठरणार पहिले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 04:51 PM2021-10-05T16:51:25+5:302021-10-05T17:29:25+5:30
पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली
पुणे: सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालिका लवकरच पादचारी दिन साजरा करणार असल्याची घोषणा आज (5 ऑक्टोबर) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी केली. देशात पुणे शहर (pune city) हे पादचारी दिन साजरा करणारे पहिले शहर असणार आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली. (Pedestrian Day in pune)
यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं सुजित पटवर्धन, हर्षद अभ्यंकर, प्रांजली देशपांडे, सूरज जयपूरकर, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह पथ, मेट्रो, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित घटकांकडून पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, याबद्दल मते जाणून घेतली गेली.
पुणे ठरणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 5, 2021
सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हाही अत्यंत महत्त्वाचा घटक असून पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने आपली पुणे महापालिका लवकरच पादचारी दिन साजरा करणार असून त्याची आज घोषणा होत आहे. pic.twitter.com/dj8qNfldhL
शिवाय शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली. केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.