पुणे शहराला एकही मंत्रिपद नाही;राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी घोर निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:35 PM2019-12-31T15:35:47+5:302019-12-31T15:35:59+5:30

राज्यात भाजपची सत्ता असताना पुणे शहराला गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे

Pune city has no minister post | पुणे शहराला एकही मंत्रिपद नाही;राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी घोर निराशा

पुणे शहराला एकही मंत्रिपद नाही;राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी घोर निराशा

Next
ठळक मुद्देराज्यमंत्री पदासाठी आमदार चेतन तुपे तसेच सुनील टिंगरे यांचे नाव होते़ चर्चेत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला एखादे राज्यमंत्री पद तरी मिळेल, या आशेवर असलेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी घोर निराशा आली आहे़. राज्यमंत्री पदासाठी आमदार चेतन तुपे तसेच सुनील टिंगरे यांचे नाव चर्चेत होते़. 
राज्यात भाजपची सत्ता असताना पुणे शहराला गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली होती़. तर याचदरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवित ९९ जागांवर विजय संपादन केला़. मात्र, आता चार सदस्यांचा प्रभाग रद्द होऊन वार्ड पद्धती येणार असल्याने, येत्या महापालिका निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मोर्चेबांधणी केली जात आहे़. निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी व विधानसभा निवडणुकीत शहरात राष्ट्रवादीला मिळालेले मताधिक्क्य लक्षात घेता, एखादे तरी राज्यमंत्रिपद मिळेल, अशी आशा शहर पदाधिकाऱ्यांची होती. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे शहराला एकही मंत्रिपद मिळाले नाही़ 
.....
 पुणे शहराला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा नव्हती़. त्यामुळे आम्हाला याचे दु:ख नाही; परंतु जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळाले याचा जास्त आनंद आहे़. 
......
पुण्याच्या प्रश्नांची जाण असलेले अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने आता प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला.
...
निवडणुकीला आणखी पावणेदोन वर्षे आहेत, त्यामुळे आघाडी सरकारच्या माध्यमातून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्राधान्य राहणार असल्याचेही ते म्हणाले़. 
.....
पर्वतीमध्ये आनंदोत्सव 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्वती मतदारसंघाच्या वतीने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात 
आला. या वेळी अध्यक्ष नितीन कदम, नगरसेविका अश्विनी कदम, प्रिया गदादे, डॉ. सुनीता मोरे, श्वेता होनराव-कामठे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Pune city has no minister post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.