स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला आता ५ स्टार ! पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

By राजू हिंगे | Published: January 7, 2024 02:29 PM2024-01-07T14:29:47+5:302024-01-07T14:30:09+5:30

आगामी काळात आपण ७ स्टारसाठी प्रयत्न करणार

Pune city now has 5 stars in clean survey Pune Municipal Corporation received National Award | स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला आता ५ स्टार ! पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला आता ५ स्टार ! पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

पुणे: पुणे महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. पुणे शहर हे आजपर्यंत ३ स्टारमध्येच होते. मात्र महापालिकेने उत्तम कामगिरी करून पहिल्यांदाच ५ स्टार होण्याचा मान मिळवला आहे.

खरे पाहता महापालिका यासाठी २०१९ सालापासूनच प्रयत्न करत होती. मात्र काहीना काही कारणाने हे मानांकन हातून सुटत होते. मात्र अखेर महापालिकेने ही उपलब्धी मिळवली आहे. याबाबत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अशा २४ विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टींत महापालिकेच्या घनकचरा विभागाने चांगली प्रगती केली आहे. पुणे महापालिका आगामी काळात ७ स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

११ जानेवारीला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षणमधील रँकिंगदेखील कळणार आहे. केंद्र सरकारने ११ जानेवारीला राज्यातून फक्त ३ शहरांनाच निमंत्रण दिले आहे. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. पुणे महापालिकेचे याबाबत कौतुक होत आहे.

पुणे शहराला पहिल्यांदाच ५ स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात आपण ७ स्टारसाठी प्रयत्न करणार आहोत. ५ स्टारमध्ये देशातील ८-९ शहरे आहेत. त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

स्वच्छ सर्वेक्षण २०२३, पुणे महापालिकेला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. मनपा आयुक्त यांचे प्रशंसनीय नेतृत्व व विश्वास, अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शन, तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कठोर परिश्रम यांमुळे हे घडले आहे. आजी-माजी पदाधिकारी, पत्रकार आणि पुणेकर नागरिक यांचेदेखील यात मोलाचे योगदान आहे. मात्र आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जोमाने काम करू. - संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

 

Web Title: Pune city now has 5 stars in clean survey Pune Municipal Corporation received National Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.