Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:35 PM2022-03-03T20:35:02+5:302022-03-03T20:35:28+5:30

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ८०५ इतकी झाली आहे

Pune city Only 78 corona affected on Thursday | Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

Next

पुणे : पुणे शहरात गुरुवारी २ हजार ९६९ कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यापैैकी ७८ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले, तर दिवसभरात २१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ८०५ इतकी झाली आहे.

शहरात गुरुवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या ५७ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैैकी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे प्रमाण ३२.६७ टक्के इतके आहे. शहरात ५०८ व्हेंटिलेटर बेड, तर ४ हजार ८५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. आजपर्यंत पुण्यात ४४ लाख ९६ हजार १९७ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ६० हजार ६७४ कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यापैैकी ६ लाख ५० हजार ५२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९३४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Web Title: Pune city Only 78 corona affected on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.