पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:18 PM2020-02-04T12:18:34+5:302020-02-04T12:19:20+5:30
पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनवरील पंपिंग व विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती
पुणे : महापालिकेच्या सर्व पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनवरील पंपिंग विषयक व विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दि़ ६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दि़ ७ फे बु्रवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपिंगविषयक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी पर्वती जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, कर्वे रोड, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कोंढवा, चतु:शृंगी/ एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र भागातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, बावधान, बाणेर, चांदणी चौक, वारजे माळवाडी, सुतारवाडी, सूस यांसह लष्कर जलकेंद्र भागातील लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा परिसर, नगर रस्ता, वडगाव शेरी, खराडी, सोलापूर रस्ता, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर यांसह
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.