Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:16 IST2025-03-31T17:15:20+5:302025-03-31T17:16:02+5:30

Pune Water Cut: शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

Pune city water supply will remain closed on Thursday | Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे: महापालिकेची विविध जलकेंद्रे, पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या यासंबंधीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. ३ एप्रिल) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉंईट, भामा आसखेड, लष्कर जल केंद्र, होळकर जलकेंद्र, बडगाव जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग कात्रज, केदारेश्वर टाकी, महादेवनगर टाकी, आगम मंदिर टाकी, श्रीहरी टाकी, खडकवासला जॅकवेल, वारजे फेज क्र. १ व २, वारजे जल केंद्र, एसएनडीटी, एचएलआर, चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जीएसआर टाकी, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जल केंद्र, एसएनडीटी (एमएलआर), चतुर्युगी टाकी, कोंडवे धावडे जल केंद्र व रॉ वॉटर आदी ठिकाणी विद्युत आणि पंपिंग विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: Pune city water supply will remain closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.